Generic placeholder image

"Pratidhvani" is an e-Quarterly magazine of Pravara Kanya Vidya Mandir & Jr. College. This initiative is taken by the school to provide a platform for budding writers among students, as well as teachers.
Issues of "pratidhvani" are made avialbale in PDF format for reading. The readers are encouraged to share the same with their family, friends and relatives and provide us with your valuable feedback and suggestions.

"प्रतिध्वनी" हे प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने नव्यानेच सुरु केलेले ई-त्रैमासिक आहे. विद्यार्थ्यां मधील नवोदित लेखक, तसेच शिक्षक यांना साहित्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी हा उपक्रम शाळेने हाती घेतला आहे. "प्रतिध्वनी" चे अंक वाचनासाठी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाचकांना त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसमवेत हे त्रैमासिक ईमेल व व्हॅटसपद्वारे सामायिक करण्यासाठी आणि आपला बहुमूल्य अभिप्राय आणि सूचना आम्हाला देण्यासाठी विनंती करीत आहोत.

Editorial Board »

प्राचार्या सौ. लीलावती सरोदे - मुख्य संपादक
प्राचार्या सौ. भारती कुमकर - उपमुख्य संपादक
प्रा. गिरीश सोनार - कार्यकारी संपादक
श्रीमती भारती देशमुख - सहयोगी संपादक

विभागीय संपादक :
उच्च माध्यमिक विभाग - प्रा. सौ. छाया मुळे
माध्यमिक विभाग - श्री. मधुकर पडवळ
प्राथमिक विभाग - सौ. सीमा बढे, सौ. शालन पोलादे

विद्यार्थिनी संपादक :
उच्च माध्यमिक विभाग - कु. श्रुतिका वाघ, कु. अस्मिता विखे (इ. ११वी)
माध्यमिक विभाग - कु. तनुश्री भवार (इ. ९वी ड), कु. काजल मगर (इ. ९वी क)

Generic placeholder image

पूर्वपीठिका

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९६४ साली लावलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर आज एका महाकाय वटवृक्षामध्ये झालेले आपण पाहतो आहोत. पद्मश्रींनंतर पदमभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी "Think Globally, Act Locally" हा मंत्र देत प्रवरा शिक्षण समूहाला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला. त्यांचाच वारसा पुढे नेत आद. आ. श्री. राधाकृष्ण विखे पाटील व आद. ना. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी प्रवरेच्या शिक्षण यात्रेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जग पादाक्रांत करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.
प्रवरा कन्या विद्या मंदिर ही या वटवृक्षाची एक अग्रणी शाखा ! परंपरांचा मान राखून आधुनिक विचार स्वीकारणारी व अंगिकारणारी एक आद्य शिक्षण संस्था ! नवनवीन उपक्रम राबवणारे व अनेक पुरस्कार मिळवणारे मुलींचे विद्यालय ! अध्ययन, क्रीडा, कला, सामाजिक बांधिलकी अशा सर्व क्षेत्रात आवर्जून पहिल्या रांगेत राहणारी एक शिक्षण संस्कृती !
याचाच एक भाग म्हणून या वर्षीपासून विद्यालयाने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे 'प्रतिध्वनि' हे e-त्रैमासिक ! विद्यालयाशी निगडित सर्व घटकांसाठी विचार अभिव्यक्त करण्यासाठी उपलब्ध झालेले अभिनव व्यासपीठ !
तसे दरवर्षी विद्यालय 'मनस्वी' हे वार्षिक नियतकालिक प्रसिद्ध करीतच आहे. परंतु वेळोवेळी विद्यालयात राबवले जाणारे उपक्रम, विद्यार्थिनींचे विविध क्षेत्रातील यश, विद्यालयास मान्यवरांनी दिलेल्या भेटीगाठी या व अशा अनेक गोष्टी पालक व इतर हितचिंतक यांच्यापर्यंत पोहचण्यास वार्षिकाच्या माध्यमातून उशीर होतो याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच 'प्रतिध्वनि' या e-त्रैमासिकाद्वारे आम्ही आपणां सर्वांपर्यंत पोहचत आहोत. दुसरा विषेश भाग म्हणजे हे त्रैमासिक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसिद्ध होत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्याचा एक प्रयत्न होत आहे. तसेच ते जलदगतीने आपणांपर्यंत पोहोचेल असाही आमचा प्रयत्न आहे.
या आमच्या नवीन उपक्रमाला आपल्या शुभेच्छा तर असतीलच, पण आमचे शिक्षक व विद्यार्थिनी यांच्याबरोबर आपणही आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीद्वारे यात सक्रिय सहभाग नोंदवाल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद !

Back to top